आचरा येथे 12 उज्वला गँस कनेक्शन लाभार्थ्यांना वितरीत
1 min read
आचरा येथे 12 उज्वला गँस कनेक्शन लाभार्थ्यांना वितरीत…
सिंधुदुर्ग-विवेक परब-
सिंधुदुर्ग कृषी औद्योगिक सेवा सहकारी संघ लि. सिंधुदुर्ग व इण्डेन उज्वला गँस एजन्सी मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज लौकिक सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सौ. अनुष्का गांवकर व माजी सरपंच मंगेश टेमकर यांच्या हस्ते 12 लाभार्थ्यांना पंतप्रधान उज्वला गँस कनेक्शन वितरीत करण्यात आले. तसेच अनेक जनांची KYC करण्यात आली. यासाठी माजी सरपंच प्रणया टेमकर यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पूर्वा तारी, लवू मालंडकर, संतोष गावकर, रणजित पांगे तसेच लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार अनुष्का गांवकर यांनी मानले.
