मालवण तालुका ब्राह्मण मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
1 min read
मालवण तालुका ब्राह्मण मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!
सिंधुदुर्ग-विवेक परब-
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचा वार्षिक स्नेह मेळावा मसुरे देऊळवाडा खेरवंद येथे अरुण वझे यांच्या निवासस्थानी आशिष आपटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ
श्री गणेश पूजन, श्री परशुराम महाराज प्रतिमा पूजन, गोपूजन विधीने झाला. यजमानपद श्री अरुण वझे तसेच पौरोहित्य श्री चंद्रशेखर (बाबु) खाडीलकर यांनी सांभाळले. संमेलनाचे दीप प्रज्वलन श्री आशिष आपटे, श्री मंदार सरजोशी, श्री मिलिंद कुंटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी सामूहिकरित्या श्री अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
सूत्र संचालन व प्रास्ताविक श्री उदय मेहंदळे यांनी केले. प्रमुख व्याख्याते वे.मू.श्री सचिन भाटवडेकर यांनी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरी आणि पसायदान ओवींचा विस्तृत महत्त्वपूर्ण अर्थ याचे मार्गदर्शन केले.
मसुरा येथील उदयोन्मुख कीर्तनकार श्री अविनाश नाईक यांनी कीर्तन सेवा सादर केली. श्री निलेश सरजोशी यांनी पंचद्रवीड पतसंस्था कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच सभासद होण्यासाठी आवाहन केले. सौ वर्षाराणी अभ्यंकर ,श्री सुबोध कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संमेलन अखेरीला अध्यक्ष श्री आशिष आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. या संमेलनाची जबाबदारी मसुरा दशक्रोशी विभागाची होती. पुढील तालुका संमेलन आचरा विभागात होणार असल्यामुळे आचरा विभाग अध्यक्ष श्री उदय मेहंदळे यांनी श्री मिलिंद कुंटे यांच्या हस्ते संमेलनाचा नारळ स्वीकारला. भोजन व्यवस्था श्री राजा गोरे, श्री दादा जोशी, श्री मोडक आणि स्थानिक महिला पुरुष यांनी उत्तमरीत्या बजावली. यावेळी अध्यक्ष आशिष आपटे, उदय मेहेंदळे, उपाध्यक्ष मंदार सरजोशी, वर्षाराणी अभ्यंकर आदी सत्तर सदस्य उपस्थित होते. मंदार सरजोशी यांनी आभार मानले.
